मुंबई-मडगाव २ सेवा आणि मुंबई-सोलापूर १ एकेरी विशेष गाडी
मुंबई, 28 मे (हिं.स.) - मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे:

(१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (२ सेवा)

गाडी क्रमांक 01173 विशेष गाडी दिनांक ३०.०५.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

गाडी क्रमांक 01174 विशेष दिनांक ३०.०५.२०२६ रोजी मडगाव येथून १६.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

संरचना: १६ शयनयान, ४ सामन्य द्वितीय श्रेणी (ज्यात अनारक्षित सामन्य द्वितीय श्रेणी म्हणून चालणारे २ शयनयान डब्बे समाविष्ट आहेत) आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

(२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर एकेरी विशेष (१ सेवा)

गाडी क्रमांक 01175 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ३१.०५.२०२६ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी.

संरचना: १६ शयनयान, ४ सामन्य द्वितीय श्रेणी (ज्यात अनारक्षित सामन्य द्वितीय श्रेणी म्हणून चालणारे २ शयनयान डब्बे समाविष्ट आहेत) आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण: विशेष गाडी क्रमांक: 01173 आणि 01175 साठी आरक्षण दिनांक २९.०५.२०२६ रोजी सुरू होईल सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

 rajesh pande