
बीड, 28 मे (हिं.स.)।केज तालुक्यातीलयुसूफवडगाव महसूल मंडळात वादळासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. फळबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने केली.माजी आमदार संगीता ठोंबरे व जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार अशोक भंडारे यांना निवेदन दिले.
वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी दिगांबर भीमराव ससाणे यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची, सोने सांगळी, सुर्डी, थापरी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली असून वीज तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी रोहित्र कोसळल्याने वीजपुरवठाही विस्कळित झाला आहे. तसेच शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी पृथ्वीराज पाटील, दादासाहेब ससाने, दत्तकुमार काकडे, महेंद्र चाटे, विकास काशीद, आकाश चाळक, प्रकाश गुंड, आदित्य रांजणकर, आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis