सरकारकडून पीएम घरकुल योजनेसाठी निधी मंजूर
लातूर, 28 मे, (हिं.स.)। ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) राबवली जाते. या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे
घरकुल


लातूर, 28 मे, (हिं.स.)। ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) राबवली जाते. या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे निधीअभावी रखडली होती. मात्र आता शासनाने थकीत हप्त्यांच्या वितरणाला मंजुरी दिल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून नवीन निधी मंजूर झाल्याने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच घरकुलाचे हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळे रखडलेली घरकुल बांधकामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लाभार्थी यादीत नाव कसे तपासाल?

नागरिक आता घरबसल्या मोबाईलवरून लाभार्थी यादी तपासू शकतात. PMAY-G च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन AwaasSoft → Reports → Beneficiary Details for Verification हा पर्याय निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरल्यानंतर संपूर्ण यादी पाहता येते.

यादीमध्ये काय माहिती मिळते?

▪️ लाभार्थ्याचे नाव

▪️ घरकुल मंजुरी क्रमांक

▪️ बांधकामाची सद्यस्थिती

▪️ हप्त्यांची माहिती

ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाची ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande