
रत्नागिरी, 28 मे (हिं.स.) । रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत शिवाजीनगर, चर्मालय स्टॉप, मजगाव रोड येथील स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करण्यासाठी बसविण्यात आलेली गॅस शवदाहिनी आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार गॅस शवदाहिनीमध्ये आवश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी आणि पर्यायी व्यवस्था वापरावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी