जनगणना 2027 पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेच्या मागण्या; अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
नांदेड, 28 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे के. सचिन (मिटकाय एस.सी. जनगणना सहाय्यक संचालक) यांची भेट घेऊन जनगणना 2027 संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ही भेट महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प
जनगणना 2027 पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेच्या मागण्या; अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद


नांदेड, 28 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे के. सचिन (मिटकाय एस.सी. जनगणना सहाय्यक संचालक) यांची भेट घेऊन जनगणना 2027 संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

ही भेट महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी जनगणना कार्यासाठी नियुक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाच्या मागण्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत राज्यातील प्रगणकांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या :

जनगणना कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे सुरक्षा विमा कवच लागू करावे

प्रत्येक प्रगणकाला फक्त एकच एचएलबी गटाचे काम देण्यात यावे, अन्यथा अतिरिक्त प्रगणक नेमावा किंवा दुप्पट मानधन द्यावे

शिक्षकांची नियुक्ती त्यांच्या मूळ शाळेच्या परिसरातच करावी

निवडणूक प्रक्रियेप्रमाणे दर्जेदार साहित्य व स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत

जनगणना कार्यासाठी मानधन वाढवून 50 हजार रुपये करण्यात यावे

या शिष्टमंडळात मराठवाडा विभाग अध्यक्ष संजय कोठाळे, कोकण विभाग अध्यक्ष गणेश पोतदार, ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी, जिल्हा कार्यवाह संजीव अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ही माहिती राज्य संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील आणि विठ्ठल मुखेडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande