पुणे - नागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती
पुणे, 28 मे (हिं.स.)। देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि नागरी विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत जनगणना कर्मचारी सक्रियपणे योगदान देत आहेत.शहरातील विविध विभागांतील कर्मचारी सध्या घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत असून,अचूक आणि
पुणे - नागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती


पुणे, 28 मे (हिं.स.)। देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि नागरी विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत जनगणना कर्मचारी सक्रियपणे योगदान देत आहेत.शहरातील विविध विभागांतील कर्मचारी सध्या घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत असून,अचूक आणि विश्वासार्ह माहिती नोंदविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली जात आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा,वाहतूक,निवास,सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकास यांसारख्या क्षेत्रांतील धोरणनिर्मितीसाठी आधारभूत ठरणारी व्यापक प्रक्रिया आहे. नागरिकांकडून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे विविध शासकीय योजना आणि सेवा अधिक परिणामकारकपणे नियोजित केल्या जातात. त्यामुळे माहितीची अचूकता आणि नागरिकांचे सहकार्य या दोन्ही बाबींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शहरात निवडणूक आचारसंहितेची पार्श्वभूमी आणि काही प्रशासकीय निर्बंध असतानाही नागरिकांना दैनंदिन सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने विभागनिहाय समन्वय आणि पर्यायी नियोजनावर भर दिला आहे. जनगणना जबाबदारी आणि नियमित नागरी सेवा यांचा समतोल राखत प्रशासनाकडून कामकाज सुरू ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उन्हाळ्याची तीव्रता,बदलते हवामान आणि विस्तीर्ण नागरी क्षेत्र अशा विविध आव्हानांमध्येही जनगणना कर्मचारी सातत्याने घरभेटी घेऊन माहितीचे योग्य संकलन करत आहेत. अनेक भागांत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून आवश्यक तपशील नोंदविले जात असून,या प्रक्रियेमुळे शहराच्या लोकसंख्याविषयक आणि सामाजिक वास्तवाचे अधिक अचूक चित्र समोर येण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की,जनगणना जबाबदारी आणि नियमित नागरी सेवा यांचा समतोल राखत कर्मचारी पार पाडत असलेले हे काम शहराच्या भविष्यातील विकास नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून,जनगणना कर्मचारी अत्यंत समर्पणाने घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत आहेत. जनगणना प्रक्रियेत संकलित होणारी माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अचूक व संपूर्ण माहिती द्यावी,यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande