बनावट फेरफार करून जमीन बळकावण्याचा डाव उघड; तलाठी, मंडळ अधिकारीसह तिघांवर गुन्हा
लातूर, 28 मे (हिं.स.)। शिरुर अनंतपाळ तालुक्यात महसूल विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बनावट कागदपत्रे आणि महसुली नोंदींमध्ये फेरफार करून वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संगनमत करून शासकीय रेकॉर
बनावट फेरफार


लातूर, 28 मे (हिं.स.)।

शिरुर अनंतपाळ तालुक्यात महसूल विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बनावट कागदपत्रे आणि महसुली नोंदींमध्ये फेरफार करून वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संगनमत करून शासकीय रेकॉर्डमध्ये बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागातील या प्रकारामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी राहुल संजीव व्यंजने (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबाची गट क्रमांक १४/१४/ब मधील शेतजमीन ही वडिलोपार्जित असून २००१ मध्ये झालेल्या वाटणीपत्रानुसार महसुली नोंदीत अधिकृत फ `रफार करण्यात आला होता. संबंधित फेरफार क्रमांक ३०३७ हा कायदेशीररित्या नोंदवण्यात आला होता. मात्र, नंतर काही जणांनी संगनमत करून न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेल्या जुन्या खरेदीखताचा आधार घेत नवीन फेरफार क्रमांक ७१५२ मंजूर करून घेतल्याचा

आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा फेरफार मंजूर करताना संगणकीय प्रणालीचा गैरवापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. महसुली रेकॉर्डम ध्ये हेतुपुरस्सर बदल करून जमीन दुसऱ्याच्या नावावर वळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने फिर्यादींना मोठा धक्का बसला होता. स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्याने राहुल व्यंजने यांनी थेट जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदारांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी

करण्यात आली. तहसीलदारांच्या चौकशी अहवालात तलाठ्याने शासकीय पदाचा गैरवापर करून खोटे रेकॉर्ड तयार केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महसुली कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक चुकीच्या नोंदी करून संगणकीय प्रणालीचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर झाल्यानंतर अखेर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर सामान्य शेतकऱ्यांची जमीन धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाम ळेच या प्रकरणातील सत्य बाहेर आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, शासकीय रेकॉर्डमध्ये फेरफार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनंत भंडे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande