बीड जिल्ह्यातील शिवसेनेची शुक्रवारी आढावा बैठक
बीड, 28 मे (हिं.स.)। पाटोदा येथील रोहिदास मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाचला शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्यातंर्गत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला शिवसेनेचे संपर्क मंत्री भरत गो
बीड जिल्ह्यातील शिवसेनेची शुक्रवारी आढावा बैठक


बीड, 28 मे (हिं.स.)। पाटोदा येथील रोहिदास मंगल

कार्यालयात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाचला शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्यातंर्गत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला शिवसेनेचे संपर्क मंत्री भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशीष जयस्वाल, खासदार संदीपान भुमरे, सचिव

भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर उपस्थित राहणार आहेत. बैठकीला आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना, महिला आघाडी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पाटोदा तालुकाप्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande