इबोला संसर्ग रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध, ट्रम्प प्रशासनाने सीमा निगराणी वाढवली
वॉशिंग्टन , 28 मे (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इबोला विषाणूचा संसर्ग अमेरिकेत येऊ नये यासाठी वेगाने काम करत आहे. आफ्रिकेतील काही भागांमध्ये इबोलाचे वाढते रुग्ण आढळत असताना त्यांनी ही मा
इबोला संसर्ग रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध, ट्रम्प प्रशासनाने सीमा निगराणी वाढवली


वॉशिंग्टन , 28 मे (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इबोला विषाणूचा संसर्ग अमेरिकेत येऊ नये यासाठी वेगाने काम करत आहे. आफ्रिकेतील काही भागांमध्ये इबोलाचे वाढते रुग्ण आढळत असताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता अमेरिकन नागरिकांना कोणत्याही संभाव्य संसर्गापासून सुरक्षित ठेवणे ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुबिओ यांनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत इबोलाचे रुग्ण अमेरिकेत प्रवेश करू दिले जाणार नाहीत.

रुबिओ यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी) तसेच आरोग्य आणि मानवी सेवा विभाग (एचएचएस) यांसह अनेक संस्था एकत्रितपणे काम करत आहेत. या संस्था विशेषतः डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मधील बाधित भागांमध्ये सक्रिय आहेत.या प्रयत्नांचा उद्देश इबोलाचा प्रसार त्याच ठिकाणी रोखणे हा आहे. रुबिओ म्हणाले, “आम्ही तेथे मदत आणि संसाधने वाढवली आहेत, जेणेकरून आजारावर तिथेच नियंत्रण मिळवता येईल.” अमेरिकन संस्था प्रवासी आणि सीमांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. यामागचा उद्देश असा आहे की, कोणताही संक्रमित व्यक्ती अमेरिकेत प्रवेश करू नये.

परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकन नागरिकांना प्रशासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकन संस्था देशाच्या सीमा आणि प्रवाशांवर कडक नजर ठेवून आहेत. कोणताही संक्रमित व्यक्ती अमेरिकेत प्रवेश करू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. रुबिओ यांनी आरोग्य सुरक्षेला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले. अमेरिकन नागरिकांची सुरक्षा ही परराष्ट्र धोरणाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, अमेरिकेने वीस देशांसोबत करार केले आहेत. या करारांनुसार अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना संबंधित देशांनी पुन्हा स्वीकारायचे आहे. त्यामुळे स्थलांतर नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इबोलाच्या मुद्द्यावर फार सविस्तर भाष्य केले नाही. ही बैठक प्रामुख्याने इराण, स्थलांतर, ऊर्जा धोरण आणि संरक्षण खर्च या विषयांवर केंद्रित होती.

इबोला हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रव पदार्थांच्या थेट संपर्कातून तो पसरतो. गंभीर प्रकरणांमध्ये या आजाराचा मृत्यूदर खूप जास्त असतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये गेल्या काही वर्षांत इबोलाचे अनेक उद्रेक पाहायला मिळाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande