नाशिकमध्ये आमदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत आ. राहुल ढिकलेंचा जनतेशी संवाद
नाशिक, 28 मे (हिं.स.) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६ मधील दुर्गानगर, शांतीनगर, महादेव कॉलनी आणि हनुमाननगर या भागात ''आमदार आपल्या दारी'' उपक्रमांतर्गत नाशिक पूर्वचे आ. ऍड. राहुल ढिकले यांनी भेट देऊन स्थानिक जनतेशी थेट संवाद सा
Under the 'MLA Apaa Dari'


नाशिक, 28 मे (हिं.स.) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६ मधील दुर्गानगर, शांतीनगर, महादेव कॉलनी आणि हनुमाननगर या भागात 'आमदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत नाशिक पूर्वचे आ. ऍड. राहुल ढिकले यांनी भेट देऊन स्थानिक जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आ. ऍड. ढिकले यांनी सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी सुचवलेली विकासकामे आमदार स्थानिक विकास निधीतून तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत नगरसेवक वाळू काकड, सचिन पिंगळे, सागर गायकवाड, सुरेश सोळंके तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande