पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हायटेक सुरक्षा व्यवस्था लागू होणार
पुणे, 28 मे (हिं.स.)। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या दानपेटी अफरातफरीच्या प्रकारानंतर मंदिर संस्थान समितीने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आणि कठोर निर्णय घेतले आहेत. मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठ
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हायटेक सुरक्षा व्यवस्था लागू होणार


पुणे, 28 मे (हिं.स.)। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या दानपेटी अफरातफरीच्या प्रकारानंतर मंदिर संस्थान समितीने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आणि कठोर निर्णय घेतले आहेत. मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान, फेस आणि थम्ब आयडी प्रणाली तसेच ईआरपी सॉफ्टवेअर लागू करण्यात येणार आहे.या संदर्भात मंदिर संस्थानतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. परिषदेला प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर आणि पुरुषोत्तम महाराज लोंढे उपस्थित होते.नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकारात मंदिराच्या दानपेटीतील रकमेची अफरातफर झाल्याचे समोर आले होते. मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्या एका सेवेकऱ्यानेच रोकड लंपास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा प्रकार घडल्याची माहिती देण्यात आली.या प्रकरणात मंदिराच्या कॅश विभागात संशयास्पद हालचाली करणाऱ्या विशाल वारूळे या स्वयंसेवकाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळखून आळंद पाेलिस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने २५ मे २०२६ रोजी आळंदी येथे विश्वस्त मंडळाची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी १५ कलमी कडक नियमावली जाहीर करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande