
नांदेड, 29 मे (हिं.स.)। शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत
शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली असून ही भेट विधान परिषद निवडणूक निमित्ताने घेतल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे शिवसंवाद दौऱ्याच्य निमित्ताने नांदेड येथे आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या भेटीत आगामी नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. नांदेड विधान परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करून जेष्ठ नेत्यांनी मते मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाशराव घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis