अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ४१.३९ टक्के जलसाठा
अमरावती, २९ मे (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीचा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याने यंदाच्या पावसाळ्यानंतर सिंचनासह पाणीपुरवठ्यासाठी मुबलक जलसाठा उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील विविध
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ४१.३९ टक्के जलसाठा


अमरावती, २९ मे (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीचा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याने यंदाच्या पावसाळ्यानंतर सिंचनासह पाणीपुरवठ्यासाठी मुबलक जलसाठा उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण ४१.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

यामुळे आगामी पावसाळ्यात धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यास विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यातील अप्पर वर्धा या प्रमुख धरणामध्ये सध्या २६१.४२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असून तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या ४६.३५ टक्के आहे. या धरणातून अमरावती शहरासह ग्रामीण भागातील विविध पाणीपुरवठा योजनांना पाणी दिले जाते.

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी शहानूर प्रकल्पात १८.५० दशलक्ष घनमीटर, चंद्रभागा प्रकल्पात ३२.५५ दशलक्ष घनमीटर, पूर्णा प्रकल्पात २२.२६ दशलक्ष घनमीटर, सपन प्रकल्पात १७.४८ दशलक्ष घनमीटर, तर पंढरी प्रकल्पात १२.५० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून १०३.६४ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून तो एकूण क्षमतेच्या ४०.४५ टक्के आहे. याशिवाय जिल्ह्यातील ४८ लघू सिंचन प्रकल्पांमध्ये ६८.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या ३०.१४ टक्के आहे.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांतील जलसाठा (टक्केवारी)

अप्पर वर्धा — ४६.३५ टक्के

शहानूर — ४०.१८ टक्के

चंद्रभागा — ७८.९० टक्के

पूर्णा — ६२.९३ टक्के

सपन — ४५.२८ टक्के

पंढरी — २२.१६ टक्के

४८ लघू प्रकल्प — ३०.१४ टक्के

एकूण जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ४१.३९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande