
बीड, 29 मे (हिं.स.)।
आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळील मोकळ्या शेतात आणि बाभळीच्या झाडीत बेकायदेशीर कत्तलीसाठी क्रूरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल ५५ जनावरांची आष्टी पोलिसांनी छापा मारून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी ४८ गायी व बैल, तीन रेडके आणि चार जर्शी गायी अशा एकूण ५५ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर तस्कर फरार झाले.
शहरातील मंदिर परिसरातील बाभळीच्या झाडीत आणि शेतात मोठ्या प्रमाणावर जनावरे कत्तलीच्या बांधून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याआधारे पोलिसांनीगवारे वस्तीवरही ५१ गोवंश जनावरांची सुटका केली
वस्तीवरही छापा टाकला. यावेळी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या ५१ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत तब्बल १० लाख ६४ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी ताब्यात घेतलेली सर्व जनावरे गोशाळेत हलविली आहेत. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खडकत परिसरात ही जनावरे बेकायदेशीर कत्तलीसाठी नेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद वाहतूक आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis