
लातूर, 29 मे (हिं.स.)।
महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० आणि विविध शासन निर्णयामधील तरतुदींनुसार पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लातूर, औसा-रेणापूर, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर अशा पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येते.
नागरिकांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच जात प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलवरून काढताना काही अडचणी किंवा समस्या येत असल्यास, अथवा कोणतीही फसवणूक होत असल्यास नागरिकांनी त्याबाबतची तक्रार प्रशासनाच्या ०२३८२-२२०२०० या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis