
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)। वादळी वाऱ्यांपूर्वी धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे
काही महिन्यांपूर्वी
मुंबई येथे होर्डिंगमुळे मोठी दुर्घटना झाली होती अशी घटना घडू नये यासाठी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने जाहिरात एजन्सी व होर्डिंग धारकांना धोकादायक होर्डिंग्ज, फाटलेले फ्लेक्स आणि सैल झालेले स्ट्रक्चर तातडीने हटविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होर्डिंग्जची तपासणी, दुरुस्ती व देखभाल करणे बंधनकारक असून, दुर्घटना घडल्यास कंत्राटदारावर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की ही कारवाई तातडीने होणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis