
बीड, 29 मे (हिं.स.)।
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला.
शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या 68 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बीडच्या केज येथे घडली. श्रीकांत शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी आलेले रसूल गफूर सय्यद असं वृद्धाचं नाव आहे. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, त्या संदर्भात काही मदत मिळेल यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी रसूल सय्यद हे कुटुंबातील सदस्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते.
मोठ्या प्रमाणात गर्दी होती, उष्णताही होती त्यामुळे श्वास घ्यायला त्रास झाला आणि गुदमरल्यासारखे झाले त्यावेळी आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला असं. त्यांचा मुलगा पाशा सय्यद यांनी सांगितला. विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वार्डात वयोवृद्ध पेशंट आले होते. आल्यानंतर आम्ही सीपीआर देऊन उपचार केला मात्र यश आले नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, असं डॉ बाळासाहेब अस्वले यांनी सांगितले.
खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांचे हृदयविकाराने निधन झाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सय्यद कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या 78 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis