
कोल्हापूर, 29 मे (हिं.स.)। ‘आज सर्वच क्षेत्रात ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. सेवा पुरवणारी यंत्रणा ग्राहकावर अवलंबून असल्याने ग्राहक समाधान महत्वाचे असते. म्हणूनच सेवा अधिक गुणात्मक होण्याकरिता ग्राहकासोबत दुहेरी संवाद महत्वाचा आहे, असे मत महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केले. ‘ग्राहकोपयोगी निवडक निर्णय’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकात महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या महत्वाच्या निर्णयांचा समवेश करण्यात आला आहे. महावितरणच्या ताराबाई पार्क कोल्हापूर येथील लघु प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम (२७ मे रोजी) संपन्न झाला. यावेळी मंचावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सदस्या व कोषाध्यक्षा सुनिता राजेघाटगे, महावितरण कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य बी.जे.पाटील, ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अरविंद यादव, कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव सुधाकर जाधव, स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस उपस्थित होते.
यावेळी सुनिता राजेघाटगे यांनी ग्राहक पंचायतच्या कामकाजा विषयी माहिती दिली. ग्राहकतिर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रेरणेनेच या पुस्तकाची निर्मिती झाली असून वीज ग्राहकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यास या पुस्तकाची दीपस्तंभाप्रमाणे मदत होईल असे मत व्यक्त केले. महावितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अरविंद यादव यांनी सोप्या भाषेतील निवडक निर्णयाच्या अभ्यासाने विद्युत तक्रारी सोडविण्यासाठी नवी दिशा मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आरती पोतनीस यांनी ग्राहक गीत सादर केले. ग्राहक पंचायत मंचाचे जिल्हा संघटक व पुस्तकाचे संपादक अशोक पोतनीस यांनी सुत्रसंचालन केले. सुरेंद्र दास यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी अभियंते दत्तात्रय भणगे, तुकाराम भिसे(से.नि.), जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले प्रकाश इंगवले, अनुपमा देशपांडे, अनिल देशपांडे, शिवगोंडा पाटील, प्रवीण ओसवाल, मनीष नगरशेठ, बिपिन दावडा, श्रीकांत दुधाणे, सतिश फणसे, शिवानी पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, शशिकांत जाधव, हेमंत पाटील, भरत भोसले, संजय सावंत, दिलीप बोंद्रे, शिवगोंडा पाटील, दिलीप महाजन, सागर माने, भाऊसाहेब विचारे, कृष्णात पाटील, तानाजी कांबळे, अक्षय पोतनीस, सुरेश पारकर, दिनकर पाटील, प्रदीप वरांबळे, बिपिन दावडा, प्रकाश डोईफोडे, सारंगदास पाटील, श्रीपती गुरव, दादासो शेलार, अमोल सुतार, धनंजय शिंदे व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar