
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)।
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाधानकारक काम झाल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मिसिंग लिंक शोधण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी समाधानकारक काम केले आहे. पण या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन सॅम्पल केसेसचा आढावा घेतला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे? हे समजून घेतले पाहिजे. ग्राऊंड रिपोर्ट काय सांगतो व आपल्याला येणारा अहवाल काय सांगतो हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे आज मराठा समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील म्हणाले, आज आम्ही मराठा आरक्षणाचा विस्ताराने आढावा घेतला. या प्रकरणी मुख्य प्रश्न जात प्रमाणपत्र देण्याचा आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही कारवाई झाली. त्यात जवळपास 3 लाख जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून देण्यात आली आहे. यापुढेही जसे अर्ज येतील, तशी कारवाई होईल.
किमान पुढच्या काही दिवसांत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन सॅम्पल केसेसचा आढावा घेतला पाहिजे.
वस्तुस्थिती काय आहे? हे समजून घेतले पाहिजे. ग्राऊंड रिपोर्ट काय सांगतो किंवा आपल्याला येणारा अहवाल काय सांगतो हे पाहिले पाहिजे. कुठे काही विसंगती आढळत असतील आणि त्याचा विनाकारण नागरिकांना त्रास होत असेल तर त्या मिसिंग लिंक शोधण्याची गरज आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी समाधानकारक काम झाले आहे, असे विखे पाटील म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis