आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा लातूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
लातूर, 29 मे (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक
लोकशाही दिन


लातूर, 29 मे (हिं.स.)।

लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आगामी सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती लातूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश पवार यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande