

नाशिक, 29 मे (हिं.स.)
- नाशिक तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी योग्य न्याय मिळावा या मागणीसाठी म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना गेट वरती अडविले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या सर्व आंदोलन करताना चर्चेसाठी बोलविण्यात आलेले आहे. तर या आंदोलनाचे प्रमुख नेते साहेबराव दातीर यांनी सांगितले की, जोपर्यंत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे.
नाशिक शहर व तालुक्यातुन होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 66 किलोमीटरचा रिंग रोड जात आहे. त्यासाठी दरी मातोरी मुंगसारा मखमलाबाद, वासाळी, व लगतच्या परिसरातून जागा संपादित कमी करण्याचे काम सुरू झालेला आहे काही ठिकाणी प्रशासनाला जागा संपादित करण्यात यश आले आहे मात्र दुसरीकडे दरी, मातोरी, मुंगसारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला त्यानंतर या ठिकाणी शेतकरी आणि महिला वरती मोठ्या प्रमाणावर ती लाठीचार्ज झाल्याची घटना देखील झाली होती.
हे सर्व घडत असताना देखील अजून पर्यंत या सर्व प्रकरणावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मागील चार दिवसापासून रामकुंड या गोदावरी किनारी असलेल्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणामध्ये सहभागी झालेल्या सर्वसाधारण चार जणांची प्रकृती ही खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरित शेतकरी हे या ठिकाणी आंदोलन करत आहे महिला व शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला करणाऱ्या प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचे प्रतीकात्मक श्रद्धा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तो पोलिसांनी उधळून लावल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला शुक्रवारी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये शेतकऱ्यांनी विविध भागातून पायी चालत येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वरती धन्य प्रदर्शन केले त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या शेतकऱ्यांना चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले असून हे शेतकरी चर्चा करीत आहेत त्यामध्ये अजून पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही संतप्त असून यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चौकट
जोपर्यंत जिल्हा प्रशासन जमिनीचा योग्य भाव देत नाही किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत योग्य ती भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.
साहेबराव दातीर , आंदोलनाचे प्रमुख नेते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV