
लातूर, 29 मे (हिं.स.) नेपाळमधील काठमांडू येथे दिनांक २ ते ४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय शोतोकॉन कराटे स्पर्धेसाठी लातूर येथील युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीच्या १० विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल देवघर निवासस्थानी भाजप च्या प्रदेश उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून लातूरचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक तुषार अवस्थी, प्रशिक्षक करण पवार, आदित्य जगदाळे, प्रसाद माळी, गौरव कोरे तसेच दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, शशिकांत बिराजदार, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis