
नांदेड, 29 मे (हिं.स.)। सिडको हडको परिसरातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अंधाराच्या साम्राज्यात असलेल्या परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला असुन या भागातील मुख्य रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) अखेर सुरू झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे. अनेक वर्षांची ही समस्या मार्गी लागल्यामुळे विविध प्रतिष्ठानचे व्यापारी, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन व प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन स्ट्रीट लाईट चालू केल्याने समाधान व्यक्त केले आहे.
सिडको हडको परिसराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी या भागातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे, वैजनाथ देशमुख, मंगला गजानन देशमुख, सौ. निरंजना राजू लांडगे आणि सौ. सुवर्णा सतीश बसवदे यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच हा प्रलंबित असलेला स्ट्रीट लाईट प्रश्न सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे निकाली निघाला आहे. सिडको-हडको परिसरातील मुख्य
रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधार असल्याने वाहन धारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र, पाचही लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने या रस्त्यांवर नवे आणि पथदिवे कार्यान्वित केले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ते उजळून निघाल्याने या भागाचे रूपच बदलून गेलेआहे.
केवळ पथदिवेच नव्हे, तर या पाचही नगरसेवकांच्या एकत्र येण्यामुळे सिडको हडको परिसरातील इतरही अनेक रखडलेली विकासकामे आता जलद गतीने मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी, रस्ते, आणि सांडपाण्याची व्यवस्था यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवरही या लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रवास करताना भीती वाटायची, नगरसेवकांच्या एकजुटीमुळे आणि मनपाच्या तत्परतेमुळे आता रस्ते उजळले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते संभाजी चौक, राज चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा मार्ग, ज्ञानेश्वर मार्ग, डॉ. ढगे, गोविंद गार्डन या मुख्य मार्गावर हे स्ट्रीट लाईट चालू झाले
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis