
बीड, 29 मे (हिं.स.)।
निसर्गाचा लहरीपणा आणि वातावणातील बदलाचा परिणाम रानमेवा असलेल्या जांभळांवरही झाला असून, बाजारात गावरान जांभळांची आवक कमी झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा जांभुळ उत्पादनात मोठी घट झाली आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे जांभूळ उत्पादनास फटका बसल्याने गावरान जांभूळ दुर्मिळ झाले आहेत. वृक्षतोडीने जुनी जांभळाची झाडे कमी झाली आहेत. या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. त्यामुळे गावरान जांभळाचा आस्वाद दुर्मिळ झाला आहे. सध्या बाजारात जांभळाला मागणी आहे; मात्र उत्पादन कमी झाल्याने ग्राहक महाग का होईना ते खरेदी करत आहेत. गतवर्षी जांभूळ ७० ते ८० रुपये किलो विकले होते. यंदा मात्र १२० ते १६० रुपये एक किलो जांभळासाठी मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.
यंदा वातावरणातील बदलामुळे झाडाला फळधारणा कमी आहे. यामुळे फक्त २० ते ३० टक्केच फळ हाताशी आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis