
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)। अतुल सावे यांच्या नावावरील हरकत उच्च न्यायालयाने फेटाळली
असल्याची माहिती मिळाली आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील प्रारूप मतदार यादीत अतुल सावे यांच्या नावाला घेण्यात आलेली हरकत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली. नागेश्वरवाडीतील पी. के. अण्णा सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून सावे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नावावर शेख हुजेफ शेख फारुक यांनी आक्षेप घेतला होता. सावे हे कायमस्वरूपी सदस्य नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा आक्षेप ग्राह्य धरला नाही. तसेच याचिकाकर्ते संबंधित सोसायटीचे सदस्य नसल्याने त्यांना हरकत घेण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिका फेटाळली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis