जागतिक टीकेदरम्यान नेतान्याहूंचे भारत कौतुक; भारत-इस्रायल संबंधांना म्हटले ‘अतूट’
जेरुसलेम , 29 मे (हिं.स.)। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जागतिक स्तरावर घटती लोकप्रियता आणि वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतासोबतच्या संबंधांचे जोरदार कौतुक केले आहे. गुरुवारी वेस्ट बँकमधील एका परिषदेत बोलताना नेतान्याहू यांनी भा
जागतिक टीकेदरम्यान नेतान्याहूंचे भारत कौतुक; भारत-इस्रायल संबंधांना म्हटले ‘अटूट’


जेरुसलेम , 29 मे (हिं.स.)। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जागतिक स्तरावर घटती लोकप्रियता आणि वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतासोबतच्या संबंधांचे जोरदार कौतुक केले आहे. गुरुवारी वेस्ट बँकमधील एका परिषदेत बोलताना नेतान्याहू यांनी भारतासारख्या मोठ्या शक्तीसोबत इस्रायलचे असलेले अनोखे संबंध अधोरेखित केले. तसेच, “माझे सर्वाधिक फॉलोअर्स भारतात आहेत,” असेही ते म्हणाले.

वेस्ट बँकमध्ये आयोजित परिषदेत नेतान्याहू म्हणाले की, जगातील अनेक भागांमध्ये इस्रायलला आपल्या वैधतेबाबत अडचणींचा सामना करावा लागत असताना, भारतात मात्र इस्रायलला “प्रचंड आणि अतूट” पाठिंबा मिळत आहे. “लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता, इस्रायलचे सर्वाधिक समर्थक आणि फॉलोअर्स आज भारतातच आहेत,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकन जनतेमध्ये नेतान्याहू यांच्या घटत्या लोकप्रियतेच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, 60 टक्के अमेरिकन प्रौढ नागरिक इस्रायलबाबत नकारात्मक मत व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 53 टक्के होता. तसेच, जगातील घडामोडींमध्ये योग्य निर्णय घेण्याबाबत निम्म्याहून अधिक अमेरिकन नागरिकांना नेतान्याहूंवर फार कमी किंवा अजिबात विश्वास नसल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी हा आकडा 52 टक्के होता.

नेतान्याहू यांनी आपल्या लोकप्रियतेतील घसरणीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. त्याच मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानवर सोशल मीडिया बॉट फार्मचा वापर करून अमेरिकन जनमतात इस्रायलविरोधी भावना वाढवण्याचा आरोप केला.

भारतामधील आपल्या लोकप्रियतेबद्दल नेतान्याहू यांनी यापूर्वीही अनेकदा भाष्य केले आहे. 2018 मध्ये पत्नी सारा नेतान्याहू यांच्यासोबत केलेल्या नवी दिल्ली दौऱ्याचा उल्लेख करताना त्यांनी त्याला “प्रेमाचा उत्सव” असे संबोधले होते. भारतीयांच्या मनात इस्रायलविषयी प्रचंड आदर असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

त्यावेळी ते म्हणाले होते, “भारताची लोकसंख्या 1.4 अब्ज आहे आणि तिथे इस्रायल अत्यंत लोकप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे अतिशय प्रेमाने स्वागत करण्यात आले होते. मी माझ्या पत्नीसमवेत भारतात आलो होतो आणि तो संपूर्ण दौरा म्हणजे प्रेमाचा उत्सवच होता.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande