
बीड, 29 मे (हिं.स.)।
शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मराठवाड्यात राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’त बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीपूर्वी परळी येथील पवित्र श्री वैजनाथ मंदिरात भगवान महादेवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेताना राज्याच्या प्रगतीसाठी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
‘शिवसंवाद दौऱ्या’च्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधत असताना समाजाच्या सेवेसाठी अधिक ताकदीने आणि सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा या आज दर्शनातून मिळाली. श्री वैजनाथाच्या आशीर्वादाने आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, माजी खासदार आनंद परांजपे,संपर्कप्रमुख मनोज शिंदे युवासेनेचे रूपेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis