तातडीच्या दुरुस्तीसाठी रविवारी शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद
लातूर, 29 मे (हिं.स.)। शहराला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी १३२ केव्ही एमआयडीसी अतिउच्च दाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या काही फिडरवरील वीजपुरवठा रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत बंद राहणार
वीजपुरवठा  बंद राहणार


लातूर, 29 मे (हिं.स.)।

शहराला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी १३२ केव्ही एमआयडीसी अतिउच्च दाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या काही फिडरवरील वीजपुरवठा रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येणार आहे.

महावितरणच्या शहर शाखा क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही बांधकाम भवन फिडरवरील माणिकराव जाधव मंगल कार्यालय, पांडुरंग नगर, संस्कृती नगर, कन्हैया नगर, गोपाळ नगर, गोविंदा बार परिसर, रविशंकर शाळा, उत्तरादी मठ, राजनंदा शाळा, वासणगाव रोड, रामगिरीनगर, दालचिनी हॉटेल परिसर, परिवार सोसायटी, कृषी नगर, अयोध्या कॉलनी, तेरणा कॉलनी, सह्याद्री हॉस्पिटल परिसर, शाहूपुरी कॉलनी, यमुना सोसायटी, कोकाटे नगर, गुणगुणे नगर, ड्रायव्हर कॉलनी, इंजिनिअरिंग कॉलनी, पत्तेवार कॉलनी, आदर्श कॉलनी, गणेशनगर, देशपांडे कॉलनी, जुना औसा रोड, लक्ष्मी कॉलनी, महसूल कॉलनी, विठ्ठल नगर आदी भागातील वीजपुरवठा बंद राहील.

तसेच शहर शाखा क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही दयानंद फिडरवरील प्रकाश नगर, कपिल नगर, खाडगाव रोड परिसर, पारिजात सोसायटी, तुळजाई हॉस्पिटल परिसर, एमएसईबी कॉलनी, जिजामाता नगर, सरस्वती शाळेजवळील परिसर, राम रहीम नगर, सदाशिवनगर, इंदिरा गांधी शाळा परिसर, ज्ञानदेव मंगल कार्यालय, भक्ती शक्ती मंगल कार्यालय, भगवान शाळा परिसर, पार्क स्ट्रीट, गिरवलकर नगर, अमलेश्वर नगर, पंचवटी नगर, चौधरी नगर, पठाण नगर, विकास नगर, न्यू भाग्य नगर, वाल्मिकी नगर, ओल्ड रेल्वे लाईन परिसर, दयानंद कॉलेज परिसर तसेच खाडगाव रोड परिसरातील काही भागांचा वीजपुरवठाही सकाळी ७ ते ११ या वेळेत बंद राहणार आहे.

याशिवाय ११ केव्ही कीर्ती ऑईल फिडरवरील कीर्ती ऑईल मिल, इंदिरा सुत गिरणी, अरोमा हॉटेल, टेक्सटाईल झोन, कल्याणी इंडस्ट्री, डॉ. कॉलनी परिसर तसेच ११ केव्ही मारुती फेट्रो केमिकल फिडरवरील मारुती फेट्रो केमिकल परिसरातील वीजपुरवठा देखील बंद राहणार आहे.

वीजग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी लातूर शहर सनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६२०२१ या मोबाईल क्रमांकावर तसेच १९१२, १८००२१२३४३५ व १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande