समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – पुणे महापौर
पुणे, 29 मे (हिं.स.)। समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ हो
sdfg


पुणे, 29 मे (हिं.स.)। समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ मान्यवरांचा ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महापौर कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील साठे, सचिव मनोज सोनावणे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान इरा सोनावणे यांनी महापौर रवि लांडगे यांच्या कार्यावर आधारित स्वलिखित कवितेचे सादरीकरण केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती या समाजाच्या खऱ्या प्रेरणास्थान असतात. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केल्याने त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळते. पिंपरी चिंचवड शहरातील अशा गुणवंत व्यक्तींना भविष्यातही प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande