ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद
मुंबई, 29 मे (हिं.स.)।आयपीएल 2026 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी केली. संघ व्यवस्थापनाने सांगितले की,
ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा


मुंबई, 29 मे (हिं.स.)।आयपीएल 2026 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी केली. संघ व्यवस्थापनाने सांगितले की, पंतने स्वतःला कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि ती तत्काळ प्रभावाने मान्य करण्यात आली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने संघाची धुरा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने अधिकृत निवेदनात म्हटले की, ऋषभने कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि ती तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आली आहे.

फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पंतने स्वतः संघ व्यवस्थापनाकडे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि संघाने त्याच्या निर्णयाचा आदर केला आहे. टॉम मूडी म्हणाले, “ऋषभ पंतने फ्रँचायझीकडे कर्णधारपद सोडण्याची विनंती केली आणि आम्ही ती आदरपूर्वक मान्य केली. असे निर्णय कधीच सोपे नसतात. कर्णधार म्हणून ऋषभने ड्रेसिंग रूमसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आता आमचे पूर्ण लक्ष संघाच्या पुनर्बांधणीवर आणि चांगल्या कामगिरीवर आहे.”

मात्र, फ्रँचायझीकडून नव्या कर्णधाराच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत संघ व्यवस्थापन नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऋषभ पंतला आयपीएल 2025 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने विक्रमी 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. फ्रँचायझीला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ अपेक्षांनुसार ठरला नाही.आयपीएल 2026 मध्ये लखनौ संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली. संघाला 14 सामन्यांत केवळ चार विजय मिळवता आले आणि गुणतालिकेत संघ तळाशी राहिला. यापूर्वी आयपीएल 2025 हंगामातही संघाने 14 पैकी फक्त सहा सामने जिंकले होते. अशाप्रकारे पंतच्या नेतृत्वाखाली लखनौने एकूण 28 सामन्यांपैकी केवळ 10 सामने जिंकले.

कर्णधारपदासोबतच ऋषभ पंतच्या वैयक्तिक कामगिरीवरही परिणाम दिसून आला. आयपीएल 2025 मध्ये त्याने 14 सामन्यांत 269 धावा केल्या होत्या, तर आयपीएल 2026 मध्ये त्याच्या बॅटमधून 312 धावा निघाल्या. मात्र, त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता.

सध्या लखनऊ सुपर जायंट्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत फ्रँचायझी संघाच्या नव्या नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. आगामी हंगामात लखनौची धुरा कोणत्या खेळाडूकडे सोपवली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande