सोलापूरसह राज्यभरात बनावट बियाण्यांचे जाळे?; शेतकरी संघटना आक्रमक
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाण्यांच्या गोरखधंद्याचा बार्शीत पर्दाफाश झाला असून उडदाच्या ‘निर्मल’ कंपनीच्या नावाखाली बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे शेतकरी संतप्त झाले
सोलापूरसह राज्यभरात बनावट बियाण्यांचे जाळे?; शेतकरी संघटना आक्रमक


सोलापूर, 29 मे (हिं.स.)। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाण्यांच्या गोरखधंद्याचा बार्शीत पर्दाफाश झाला असून उडदाच्या ‘निर्मल’ कंपनीच्या नावाखाली बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे शेतकरी संतप्त झाले असून अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

राज्यात उडदाच्या ‘निर्मल’ वाणाचा तुटवडा असताना बार्शी शहरात मात्र या बियाण्याची कमतरता कधीच भासली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे बार्शीतील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांकडून केला जात आहे.ज्या दुकानदारांनी शेतकऱ्यांना हे बोगस बियाणे विकले, त्यांच्याकडून मागील अनेक वर्षांतील पिकांच्या नुकसानीचा मोबदला वसूल करून तो संबंधित शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.या प्रकरणामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना कृषी विभागाने कोणती कारवाई केली, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. बार्शीसह सोलापूर आणि राज्यातील अन्य भागांतही अनेक दुकानदारांमार्फत हे बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, शेतकरी संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी शासनाने केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, भविष्यात शेतकरी आणि शेती वाचवण्यासाठी अशा फसवणुकीवर कठोर लगाम घालण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande