आयपीएल २०२६ मध्ये स्मार्ट ग्लासेसवर बंदी; बीसीसीआयचे नवे सुरक्षा नियम लागू
नवी दिल्ली , 29 मे (हिं.स.)।बीसीसीआयच्या अँटी-करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने (एसीएसयू) आयपीएल २०२६ दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी नवे सुरक्षा नियम लागू केले आहेत. नव्या निर्देशांनुसार, सामन्याच्या दिवशी स्मार्ट ग्लासेस आणि इतर प्रगत आयवेअरच्या
आयपीएल २०२६ मध्ये स्मार्ट ग्लासेसवर बंदी; बीसीसीआयचे नवे सुरक्षा नियम लागू


नवी दिल्ली , 29 मे (हिं.स.)।बीसीसीआयच्या अँटी-करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने (एसीएसयू) आयपीएल २०२६ दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी नवे सुरक्षा नियम लागू केले आहेत. नव्या निर्देशांनुसार, सामन्याच्या दिवशी स्मार्ट ग्लासेस आणि इतर प्रगत आयवेअरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

एसीएसयू च्या मते, अलीकडच्या काळात अनेक तंत्रज्ञान कंपन्या आयपीएल खेळाडू आणि फ्रँचायझी स्टाफला स्मार्ट सनग्लासेस आणि स्मार्ट गॉगल्स विकत होत्या. दिसायला हे सामान्य चष्म्यांसारखे असले तरी त्यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध असतात. या उपकरणांद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग, टेक्स्ट मेसेज पाठवणे व प्राप्त करणे, ऑडिओ-व्हिडिओ कॉल करणे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसारख्या सुविधा वापरता येतात.

याच कारणामुळे एसीएसयू ने या उपकरणांना कम्युनिकेशन आणि ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइसच्या श्रेणीत समाविष्ट केले आहे. नव्या नियमांनुसार, सामन्याच्या दिवशी प्लेयर अँड मॅच ऑफिशियल्स एरिया (पीएमओए ) मध्ये स्मार्ट ग्लासेस ठेवणे किंवा वापरण्यावर पूर्णपणे बंदी असेल. ही बंदी ड्रेसिंग रूम, डगआउट आणि खेळाडूंच्या व्ह्यूइंग एरियासह सर्व हाय-सिक्युरिटी झोनमध्ये लागू राहणार आहे.

एसीएसयू च्या मते, या उपकरणांचा वापर रिअल टाइममध्ये माहिती शेअर करण्यासाठी किंवा सुरक्षेत घुसखोरी करण्यासाठी केला जाऊ शकतो.त्यामुळे त्यांना इतर प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणांप्रमाणेच मानले जाणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्टेडियममध्ये पोहोचताच आपले स्मार्ट ग्लासेस सिक्युरिटी लायझन ऑफिसरकडे (एसएलओ ) जमा करावे लागतील. मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि इतर कम्युनिकेशन डिव्हाइसप्रमाणेच ही उपकरणेही प्रतिबंधित क्षेत्रात नेण्यास परवानगी नसेल.

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की या नियमांचे पालन बंधनकारक असेल.जर एखादा खेळाडू किंवा स्टाफ सदस्य PMOA मध्ये स्मार्ट ग्लासेससह आढळला, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल. नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई आणि वैयक्तिक दंड आकारला जाऊ शकतो, असा इशारा बोर्डाने दिला आहे. आयपीएल २०२६ च्या ‘मिनिमम स्टँडर्ड्स’ नियमांनुसार शिक्षा निश्चित केली जाईल.

आयपीएल २०२६ मधील काही घटनांमुळेही बीसीसीआयची चिंता वाढली आहे. राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंदर यांच्यावर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट वापरताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंडासह एक डिमेरिट पॉइंटची शिक्षा करण्यात आली होती.या घटनांनंतर एसीएसयू ने टीम एरियामधील इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन उपकरणांबाबतचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande