महाशिवरात्रीला आता ‘द्राक्ष दिन’; भारत सरकारकडून पेटंट मंजूर
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। देशात विविध दिवस आणि दिनविशेष साजरे करण्याची परंपरा आहे. जसे २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो, त्याच धर्तीवर आता प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला ‘द्राक्ष दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारकडून
महाशिवरात्रीला आता ‘द्राक्ष दिन’; भारत सरकारकडून पेटंट मंजूर


सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

देशात विविध दिवस आणि दिनविशेष साजरे करण्याची परंपरा आहे. जसे २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो, त्याच धर्तीवर आता प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला ‘द्राक्ष दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोलापूर तासगाव येथील ‘यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनी’तर्फे महाशिवरात्रीला ‘द्राक्ष दिन’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून या उपक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली आहे.गेल्या चार वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दिवशी ‘द्राक्ष दिन’ साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत होता. या अभिनव संकल्पनेला आता भारत सरकारची पेटंट मान्यता मिळाल्याने भविष्यात हा दिवस अधिक मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.भगवान शंकराला रुद्राक्ष प्रिय मानले जाते. ‘रुद्राक्ष’मधील ‘रु’ काढल्यास ‘द्राक्ष’ हा शब्द तयार होतो, या श्रद्धापूर्ण संकल्पनेतून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, पिंडीवर वाहणे आणि प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करणे शुभ मानले जात आहे.महाशिवरात्रीच्या काळात द्राक्षांचा हंगाम जोमात असतो आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवशी देशभरात द्राक्ष सेवन आणि अर्पणाची परंपरा वाढल्यास द्राक्ष विक्रीला मोठी चालना मिळू शकते. याचा थेट फायदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande