सोलापुरात  साखर उद्योगावर दुहेरी संकट; वाढता खर्च आणि निर्यातबंदीमुळे कारखानदार हवालदिल
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। केंद्र शासनाने साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे सोलापूरसह राज्यातील साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना निर्यातीवरील बंदीम
sugar mill


सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

केंद्र शासनाने साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे सोलापूरसह राज्यातील साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना निर्यातीवरील बंदीमुळे देशांतर्गत बाजारात अतिरिक्त साठा निर्माण होत आहे. त्यामुळे साखरेच्या दरांवर दबाव वाढला असून त्याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर होत असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे.

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्र शासनाने तातडीने साखर निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली आहे. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) गेल्या सात वर्षांपासून स्थिर असल्याने कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. दुसरीकडे वीज, इंधन, वाहतूक, कामगार, दुरुस्ती आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने साखर उद्योग आर्थिक तणावाखाली आला आहे.

वाढत्या खर्चाच्या तुलनेत साखरेचे दर न वाढल्यामुळे अनेक कारखान्यांची आर्थिक गणिते बिघडली असून त्याचा फटका थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कारखान्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच कमकुवत झाल्यास शेतकऱ्यांच्या एफआरपी देयकांमध्ये विलंब होण्याचा धोका वाढणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. आधीच शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत असताना एफआरपी उशिरा मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande