छ संभाजीनगर जिल्ह्यात ६३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)। छ संभाजीनगर जिल्ह्यात ६३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. छ संभाजीनगर जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्य निव
छ संभाजीनगर जिल्ह्यात ६३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल


छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)। छ संभाजीनगर जिल्ह्यात ६३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

छ संभाजीनगर जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून सोयगावात सर्वांत कमी ४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १० जुलैपर्यंत आरक्षण प्रक्रिया पूर्ण होणार असून पावसाळ्यानंतर दिवाळीच्या सुमारास प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक कार्यरत असल्याने निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande