
लातूर, 29 मे (हिं.स.)। यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी आहे असा अंदाज हवामान खाते व्यक्त करित असतानाच लातूर जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्प या सर्व प्रकल्पात पाणीसाठा अवघ ३२.०७ टक्के असून आजचा पाणीसाठा पाहून लातूर जिल्हा वासीयांच्या तोंडचे पाणी पळाले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लातूर जिल्ह्यात लघु प्रकल्प १३५ आहेत त्यात आजच्या तारखेत एकूण २७.२३ टक्के उपयूक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात आठ प्रकल्प आहेत. त्यात २१.७५ टक्के उपयूक्त पाणीसाठा आहे. तर ज्या मांजरा प्रकल्पावर (धनेगाव) लातूर अवलंबून आहे अशा मोठ्या मांजरा प्रकल्पात केवळ २१.४९ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात ४३.२४ टक्के उपयूक्त पाणीसाठा आहे. जिल्हा ज्या मोठ्या (मांजरा-तेरणा) प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यासह मोठे, मध्यम व लघु अशा एकूण १४५ प्रकल्पात केवळ ३२.७ टक्क्यांन एवढा उपयूक्त पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात आज ३३.०६, रेणा २७.२२, व्हटी १४.३८, तिरू ११.३१, देवर्जन १४.७५, साकोळ २१.०१, घरणी २९.९० टक्के उपयूक्त पाणीसाठा आहे. तर मसलगा मध्यम प्रकल्पात ० टक्के पाणीसाठा आहे.
लातूर जिल्ह्यात प्रचंड तापमान असल्याने आहे त्या जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. तर विहीर, विंधनविहिरमधील पाण्याचा उपसा करून उसाला पाणी देण्याचा प्रयत्न जोरात चालू असल्याने भूगर्भातील पाण्याने केंव्हाच तळ गाठला आहे. पाणी जपून वापरासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृतमी लागलीच करणे आवश्यक आहे. हवामान विभाग अंदाज व्यक्त करित आहे. त्याप्रमाणे खरेच पाऊस लांबला, अपुरा पडला तर लातूर जिल्ह्यावर पाणी संकट ओढवणार आहे.
-----------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis