लातूरमध्ये महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे मेलोडी आंदोलन
लातूर, 29 मे (हिं.स.)। महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात निलंग्यात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने निलंगा येथे अनोखे आंदोलन क
आंदोलन


लातूर, 29 मे (हिं.स.)। महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात निलंग्यात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने निलंगा येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोल पंप परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नागरिकांना “मेलोडी” चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश लहू म्हेत्रे, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, प्रशांत वांजरवाडे, बालाजी सूर्यवंशी, किशोर पाटील, सतीश रुपणर, बाळू दिगंबरे, पंकज क्षीरसागर, मास शिंदे, सूरज पेटकर तसेच युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेल दर कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande