देहू रोड येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी; वारकरी आणि ग्रामस्थ आक्रमक
पुणे, 29 मे (हिं.स.) संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहू ते देहू रोडदरम्यानचा पालखी मार्ग चौपदरी करण्याची तसेच देहू रोड येथील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी चिंचोली ग
देहू रोड येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी; वारकरी आणि ग्रामस्थ आक्रमक


पुणे, 29 मे (हिं.स.) संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहू ते देहू रोडदरम्यानचा पालखी मार्ग चौपदरी करण्याची तसेच देहू रोड येथील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी चिंचोली ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके आणि अप्पर पिंपरी-चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीक्षेत्र देहूगाव ते देहू रोड राष्ट्रीय महामार्गादरम्यानचा सुमारे पाच किलोमीटरचा पालखी मार्ग सध्या अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी परिसरातील कर्मचारी, कामगार तसेच राज्यभरातून येणारे भाविक यांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मार्गाचे चौपदरीकरण तातडीने करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.तसेच, देहू रोड येथील लष्करी हद्दीत वीरस्थळाजवळ मुंबई-पुणे महामार्ग आणि पालखी मार्गाच्या चौकात उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी आणि अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, दौंड तालुक्यात पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखी मार्गाचे रुंदीकरण अद्याप प्रलंबित असल्याने वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande