श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोमवारी एकदिवसीय पारायण सोहळा
बीड, 30 मे (हिं.स.)। संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या पवित्र ''परम रहस्य'' ग्रंथाच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोमवारी १ जून रोजी एकदिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक कार्यक्रम सकाळी ८ ते सायंकाळी ५
श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोमवारी एकदिवसीय पारायण सोहळा


बीड, 30 मे (हिं.स.)। संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या पवित्र 'परम रहस्य' ग्रंथाच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोमवारी १ जून रोजी एकदिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक कार्यक्रम सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यास उपस्थित राहणार असूनविविध भागांतून अनेक शिवाचार्य यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.

लिंगायत समाजामध्ये अत्यंत श्रद्धेचा विषय असलेला 'परम रहस्य' हा ग्रंथ संत मन्मथ स्वामी यांनी रचला असून या ग्रंथामध्ये ईश्वरभक्ती, जीवनमूल्ये, अध्यात्म, तसेच महादेवाच्या महात्म्याचे सखोल व तत्त्वज्ञानात्मक विवेचन करण्यात आले आहे.त्यामुळे हा ग्रंथ समाजात अत्यंत पवित्र आणि मार्गदर्शक मानला जातो. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ध्वजपूजन व महाआरतीने होणार आहे.त्यानंतर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या संपूर्ण कालावधीत सामूहिक ग्रंथ पारायण, प्रवचन, तसेच कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर भक्तिगीत, आध्यात्मिक मार्गदर्शन व संतवचनांमुळे परिसरात अखंड भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande