छ. संभाजीनगर - विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 30 मे, (हिं.स.)। प्रादेशिक हवामानशास्त्रर केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्याकत दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्याच कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्त
छ. संभाजीनगर - विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 30 मे, (हिं.स.)। प्रादेशिक हवामानशास्त्रर केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्याकत दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्याच कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्याी कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्यास ते मध्यम स्वारुपाच्याी पावसाची शक्यतता वर्तवली आहे. तसेच दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्याा ते मध्यम स्व6रुपाच्याो पावसाची शक्यकता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मेघगर्जनेच्यार वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्याहवा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा झाकून ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हारधिकारी कार्यालयातील जिल्हाक नियंत्रण कक्ष तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande