बीड - राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारासाठी आवरगावची विभागीय तपासणी
बीड, 30 मे, (हिं.स.)। राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कार २०२६ अंतर्गत तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतीची नाशिक विभागीय कार्यालयाच्या समितीने तपासणी केली आहे. गावातील विविध विकासकामांची पाहणी करून अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या तपासणी समितीत नाशिक विभा
बीड - राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारासाठी आवरगावची विभागीय तपासणी


बीड, 30 मे, (हिं.स.)। राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कार २०२६ अंतर्गत तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतीची नाशिक विभागीय कार्यालयाच्या समितीने तपासणी केली आहे. गावातील विविध विकासकामांची पाहणी करून अभिलेखांची तपासणी करण्यात आली.

या तपासणी समितीत नाशिक विभागाचे सहायक आयुक्त राम लाहोटी, पंचायत विस्तार अधिकारी अनिल राणे, विभागीय तांत्रिकतज्ज्ञ शिवाजी सोळंके यांचा समावेश होता. समितीने शाश्वत विकास ध्येयांतर्गत थीम क्रमांक ६ पायाभूत सुविधा व नियुक्त गाव, या विषयांवर ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी सरपंच अमोल जगताप व ग्रामविकास अधिकारी बालासाहेब झोंबाडे यांनी समितीला माहिती दिली. अभिलेखे, योजनांची अंमलबजावणी, स्वच्छता, पाणीपुरवठा, गावातील पायाभूत सुविधांची समितीकडून पाहणी करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande