हिंगोली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणांना मान्यता
हिंगोली, 30 मे (हिं.स.)। अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पेन्शन मंजुरी, वारसांना नोकरी आदी विषयांवरील प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच संबंधित प्रकरणे वेळेत
हिंगोली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणांना मान्यता


हिंगोली, 30 मे (हिं.स.)।

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पेन्शन मंजुरी, वारसांना नोकरी आदी विषयांवरील प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच संबंधित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अमोल घुगे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पीडितांना आर्थिक सहाय्य, पेन्शन मंजुरी तसेच वारसांना नोकरी देण्यासंदर्भातील प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. पात्र ठरलेल्या प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच प्रकरणांच्या निकाली प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित प्रस्तावांमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता करून पात्र व अपात्रतेबाबत कार्यवाहीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पुढील आठवड्यात समितीसमोर सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande