निवृत्तीवेतनाचे नियोजन काळाची गरज; तज्ज्ञांचे मत
एमएसएमई एनपीएस जनजागृती’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नाशिक, 30 मे (हिं.स.)। भविष्यातील विविध बाबींची तरतूद करणे क्रमप्राप्त ठरते. अशात निवृत्तीवेतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अ
Retirement planning is the


एमएसएमई एनपीएस जनजागृती’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

नाशिक, 30 मे (हिं.स.)। भविष्यातील विविध बाबींची तरतूद करणे क्रमप्राप्त ठरते. अशात निवृत्तीवेतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (पीएफआरडीए), रोटरी एन्क्लेव्ह नाशिक, डब्लूएक्स कन्सल्टंट्स प्रा. लि., आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील आयमा रिक्रिएशन सेंटर येथे 'एमएसएमई एनपीएस जनजागृती' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्तीवेतनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहातांना कंपनी मालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक करतांना डब्लूएक्स कन्सल्टंट्स प्रा. लि. च्या संचालिका दिपाली चांडक म्हणाल्या, एमएसएमई क्षेत्र हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु या क्षेत्रातील मनुष्यबळाला वृद्धत्वाकाळात आर्थिक स्थैर्य मिळणे तितकेच गरजेचे आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही प्रत्येक उद्योजक आणि कर्मचाऱ्यासाठी भविष्यातील सुरक्षिततेची हमी देणारी उत्तम योजना असून, याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे हाच आमचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.पीएफआरडीएचे सहाय्यक व्यवस्थापक सुनील खांडरे म्हणाले, पीएफआरडीएच्या माध्यमातून आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाला पेन्शनच्या कक्षेत आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. एनपीएस ही अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि लवचिक योजना आहे. आजच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच खाजगी आणि एमएसएमई क्षेत्रातील घटकांनीही आपल्या निवृत्तीवेतनाचे नियोजन अत्यंत गांभीर्याने करणे आवश्यक झाले आहे.जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील म्हणाले, की नाशिकमधील उद्योगांच्या वाढीसोबतच तिथे काम करणाऱ्या कामगारांचे आणि उद्योजकांचे आर्थिक हित जपणे ही आपली जबाबदारी आहे. जिल्हा उद्योग केंद्र नेहमीच एमएसएमईच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असते. एनपीएस सारख्या योजनांचा अवलंब केल्यास उद्योगांमधील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल.आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे म्हणाले, आयमा नेहमीच नाशिकच्या औद्योगिक आणि व्यावसायिक हिताचे निर्णय घेत असते. आजच्या धावपळीच्या युगात व्यवसाय सांभाळताना भविष्यातील आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष होते. हा जनजागृती कार्यक्रम आमच्या सभासदांसाठी आणि उद्योजकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला असून, सुरक्षित भविष्यासाठी एनपीएस अंगीकारणे ही काळाची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande