शरद पवारांनी उमेदवारी दिली म्हणजे मतांचे गणितही ठरलेले – श्रीकांत पाटील
पुणे, 30 मे (हिं.स.)। पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी दूरध्वनीवर
शरद पवारांनी उमेदवारी दिली म्हणजे मतांचे गणितही ठरलेले – श्रीकांत पाटील


पुणे, 30 मे (हिं.स.)। पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी दूरध्वनीवरून अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याची माहिती श्रीकांत पाटील यांनी दिली.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, “शरद पवार यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी उमेदवारी जाहीर केली म्हणजे विजयासाठी आवश्यक असलेले मतांचे गणितही त्यांनी निश्चित केले असणार. त्यामुळे मला विजयाचा पूर्ण विश्वास आहे.”महाविकास आघाडीतील जागावाटपात पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे पक्षाने या निवडणुकीसाठी श्रीकांत पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.दुसरीकडे महायुतीमध्ये या जागेवरून अद्यापही संभ्रम कायम आहे.

राष्ट्रवादी काॅग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात जागेच्या दाव्यावरून चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय झालेला नाही. तथापि, मतदारसंघातील संख्याबळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राष्ट्रवादीच्या प्रभावामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.भाजपनेही या जागेवर दावा केला असला तरी उपलब्ध मतांची आकडेवारी आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत आघाडी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande