इगतपुरी-खर्डी भागात २ ते ५ जून दररोज दुपारी दोन तास विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई, 30 मे (हिं.स.) - मध्य रेल्वे, मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारी करीता कसारा (इगतपुरी - कसारा सेक्शन) येथे दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंत (दररोज दुपारी २ तास
इगतपुरी-खर्डी भागात २ ते ५ जून दररोज दुपारी दोन तास विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


मुंबई, 30 मे (हिं.स.) - मध्य रेल्वे, मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारी करीता कसारा (इगतपुरी - कसारा सेक्शन) येथे दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंत (दररोज दुपारी २ तास) खालील तपशिलानुसार विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे:

ब्लॉकची तारीख आणि कालावधी:

दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंत १५.५० ते १७.५० वाजेपर्यंत (दररोज दुपारी २ तासांचा ब्लॉक)

ब्लॉक विभाग:

अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन, थळ घाट रिव्हर्सल केबिन आणि खर्डी दरम्यान प्लॅटफॉर्म २, ३ आणि ४ (दोन्ही स्थानके वगळून)

दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) या ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज

ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) या कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अनुक्रमे १३.१०, १४.१७ आणि १४.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा लोकल N19, N21 आणि N23 आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.

कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे आसनगाव येथून सुटतील:

* कसारा येथून १५.३५ वाजता सुटणारी N24 लोकल आसनगाव येथून १६.१२ वाजता सुटेल,

* कसारा येथून १६.१६ वाजता सुटणारी N26 लोकल आसनगाव येथून १६.५४ वाजता सुटेल,

* कसारा येथून १७.०२ वाजता सुटणारी N28 लोकल आसनगाव येथून १७.३९ वाजता सुटेल

दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंतच्या ब्लॉकच्या आधी आणि नंतरची शेवटची आणि पहिली लोकल कसारासाठी ब्लॉकच्या आधीची शेवटची उपनगरीय सेवा N17 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल.

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल N22 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून १४.४२ वाजता सुटेल.

* कसारासाठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल N25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १६.५० वाजता सुटेल.

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल N30 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून १८.१७ वाजता सुटेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande