बीड - कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
बीड, 30 मे, (हिं.स.)। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बीड यांचे मार्फत भारतीय कृषी अनुसंधान परिषद श्री सिध्दगीरी कृषी विज्ञान केंद्र कन्हेरी जि. कोल्हापुर येथे नैसर्गीक, सेंद्रीय शेती विषयाचे तिन दिवसीय प्र
बीड - कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन


बीड, 30 मे, (हिं.स.)। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बीड यांचे मार्फत भारतीय कृषी अनुसंधान परिषद श्री सिध्दगीरी कृषी विज्ञान केंद्र कन्हेरी जि. कोल्हापुर येथे नैसर्गीक, सेंद्रीय शेती विषयाचे तिन दिवसीय प्रशिक्षण अयोजीत केले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेती जमीन व अन्नद्रव्य व्यवस्थापणासाठी निविष्ठा, घटक, उपयोग, निर्मिती व वापरए सेंद्रिय शेती कीडरोग व्यवस्थापनासाठी विविध निविष्ठा, घटक, उपयोग, निर्मिती व वापर, बिजामृत तयार करून बीज प्रक्रिया, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, कार्यपद्धती, मानके व एफ.पी.ओ., अभिलेख व्यवस्थापन, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचे महत्व ईत्यादी विषयाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, मांजरी पुणे येथे आधुनिक ऊस उत्पादन या विषयाचे तिन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये ऊसाचे भरघोस उत्पादन घेणे, खतांचा संतुलीत वापर, पाणि व्यवस्थापन ईत्यादी विषयाचे मार्गदर्शन मिळणार आहे. राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधन संस्थान, राजेंद्र नगर हैद्राबाद येथे नैसर्गिक शेती, इफ्ठ ची स्थापना, ड्रोन तंत्रज्ञान, वनस्पती आरोग्य विषयक उपाययोजना या विषयाचे ५ दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केलेले आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड आनंद गुजरात येथे दुध उत्पादन व दुग्धजन्य पदार्थ तयार करणे विक्री व व्यवस्थापन प्रात्यक्षीकाव्दारे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणा करीता प्रवास, निवास, भोजन व प्रशिक्षण फी ची व्यवस्था मार्गदर्शक सुचनेनुसार मापदंडाच्या मर्यादेत आत्मा बीड कार्यालया मार्फत करण्यात येणार आहे.

मापदंडापेक्षा जास्तीचा खर्च होणार असल्यास लोकवाटा भरण्यास लाभार्थीची तयारी असावी तसेच प्रशिक्षण पुर्ण वेळ उपस्थित राहून पार पाडणे व प्रशिक्षणा वरून परतल्यानंतर आपल्या प्रक्षेत्रावर अंमलबजावणी करण्यास तयार असावा त्यासाठी नाव नोंदणी चालु झालेली असून प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधन्य देण्यात येणार आहे. शेतकरी बंधु भगीनी यांनी, आधार कार्ड, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, फार्मर आय.डी., बँक पासबुकची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र कागदपत्रासह विनंती अर्ज शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आत्मा शाखेतील बीटीएम व एटीएम यांचेशी संपर्क साधून सादर करावा तसेच बीड जिल्हयातील शेतकरी बांधवानी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसचे बीड जिल्हयातील शेतकरी बंधु भगीनींना आवश्यक असलेल्या शेतकरी प्रशिक्षण, अभ्यासदौरा बाबत अर्ज संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आत्मा शाखेश सादर करावा उपलब्ध निधीनुसार कार्यक्रम आयोजीत करण्यात येईल असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande