जळकोट तालुक्यात प्रभाग आरक्षणाची जूनमध्ये सोडत
लातूर, 30 मे (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील प्रशासक असलेल्या २७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ग्रा
निवडणूक


लातूर, 30 मे (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील प्रशासक असलेल्या २७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची शक्यता निमर्माण झाली आहे.

या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चीत केले जाणार आहे. ओबीसींसाठी राखीव जागा एकूण जागांच्या २७ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहतील आणि एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादित राहील. याची खबरदारी घेण्याचे निर्देश आयोगाने

दिले आहेत तसेच अनुक्रमे विविध प्रभागांना आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभेची सूचना दि ८ जून, विशेष ग्रामसभा व प्रभाग आरक्षण सोडत दि. १२ जून, आरक्षण प्रारुप अधिसूचनेस (नमुना ब) जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : दि १७ जून, आरक्षण प्रारूप प्रसिद्ध हरकती व सूचना दि. १९ ते २५ जून,

उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय : दि. ३ जुलै, अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता दि. ८ जुलै, अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी: दि. १० जुलै, असा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande