झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनचा ड्रोन हल्ला; आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने व्यक्त केली चिंता
वियना, 31 मे (हिं.स.) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए ) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प (ZNPP) वर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इशारा देत म्हटले की, अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करणे
झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनचा ड्रोन हल्ला; आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने व्यक्त केली चिंता


वियना, 31 मे (हिं.स.) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए ) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प (ZNPP) वर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इशारा देत म्हटले की, अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे अत्यंत धोकादायक कृत्य आहे.

आयएईएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्प प्रशासनाने त्यांना ड्रोन हल्ल्याची माहिती दिली आहे. हा ड्रोन प्रकल्पातील एका टर्बाइन इमारतीवर आदळला. या धडकेमुळे इमारतीच्या भिंतीला छिद्र पडले आहे. राफेल ग्रॉसी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, कोणत्याही अणुऊर्जा केंद्रावर किंवा त्या केंद्रातून कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये. त्यांनी सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन करत अणुसुरक्षा आणि सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ न देण्याचे आवाहन केले.प्रकल्पात तैनात असलेल्या आयएईए च्या पथकाने नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी प्रभावित इमारतीपर्यंत जाण्याची परवानगी मागितली आहे. ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

आयएईएच्या मते, एप्रिल २०२४ नंतर प्रथमच प्रकल्पाच्या संरक्षित परिसरात ड्रोन हल्ला झाला आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रांपैकी एक आहे. मार्च २०२२ पासून हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे.रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आयएईए सातत्याने लष्करी कारवायांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत इशारे देत आहे. संस्थेने वारंवार अणुऊर्जा पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉम यांनी शनिवारी सांगितले की, एका युक्रेनियन ड्रोनने या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. मात्र, मुख्य उपकरणांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. हा ड्रोन प्रकल्पाच्या युनिट ६ च्या टर्बाइन आयलंडवर आदळला आणि तेथे स्फोट झाला. या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला देण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या सोशल मीडिया खात्यावरून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अणुऊर्जा केंद्रांवरील असे हल्ले अत्यंत बेजबाबदारपणाचे आहेत. अशा कारवायांमुळे अणुसुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. पायाभूत सुविधांवरील कोणत्याही हल्ल्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात आणि संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकतात.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठे नुकसानही झालेले नाही. रोसाटॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्सी लिखाचेव यांनी सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य उपकरणांवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला आहे. या हल्ल्यामुळे स्फोट झाला असून टर्बाइन आयलंडच्या संरचनेचे नुकसान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande