चंद्रपूर : पत्नीकडून पतीच्या खुनाची सुपारी देत हत्या
चंद्रपूर, 04 मे (हिं.स.)।भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात धक्कादायक हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीच्या खुनासाठी स्वतः पत्नीनेच १ लाख रुपयांची सुपारी देत हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आ
चंद्रपूर : पत्नीकडून पतीच्या खुनाची सुपारी देत हत्या


चंद्रपूर, 04 मे (हिं.स.)।भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात धक्कादायक हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीच्या खुनासाठी स्वतः पत्नीनेच १ लाख रुपयांची सुपारी देत हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख रविंद्र तुळशिराम कुळमेथे (४६) रा. गडचिरोली अशी पटवली. प्राथमिक तपासात हा आकस्मिक मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.१ मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले.

भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande