छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समिती कार्यकारिणी
छत्रपती संभाजीनगर, 04 मे (हिं.स.)।मराठा युवा परिषदेतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासंदर्भात परिषदेच्या टीव्ही सेंटर येथील विभागीय कार्यालयात कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब साबळे या
छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समिती कार्यकारिणी


छत्रपती संभाजीनगर, 04 मे (हिं.स.)।मराठा युवा परिषदेतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासंदर्भात परिषदेच्या टीव्ही सेंटर येथील विभागीय कार्यालयात कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यंदाच्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यंदाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद सोनवणे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी शिवाजी पळसकर, स्वागताध्यक्ष विशाल दाभाडे, सरचिटणीस विलास पवार आदींचा समावेश आहे. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष बाबासाहेब चौधरी, प्रदीप हारदे, सचिवपदी दिलीप जाधव, रामेश्वर राजगुरे, सहसचिव संदीप जाधव, योगेश औताडे, रवींद्र जाधव, सदस्य राजू काकडे, रणजित तुरे, गणेश जाधव, महिला प्रतिनिधींमध्ये दिव्या पाटील, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले आदींचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande